आमदार खताळ यांच्याकडून माझ्या मुलाची फसवणूक', हल्ला प्रकरणातील आरोपीच्या आईची तक्रार; गेल्या तीन दिवसांपूर्वी संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी प्रसाद गुंजाळ नामक आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदर हल्ला राजकीय षडयंत्रातून झाला असल्याचे आरोप खताळ समर्थकांनी केले असून मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र आता आरोपी प्रसाद गुंजाळ याची आई अनिता गुंजाळ यांनी संगमनेर पोलिसांना आमदार खताळ यांच्याकडून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक केली आहे