सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवरील ७/१२ उताऱ्यावर ई-पीकपाणी नोंदणी करून घ्यावी, महसूल विभागातर्फे चालू वर्षासाठी ई-पीकपाणी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहेत. सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या जमिनीवर पीकपाणी नोंद करून घेतलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी-विक्री करताना दस्त नोंदणीला अडथळे निर्माण होत असल्याचं सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे म्हणाले आहेत.