धडगाव तालुक्यातील महिलांनी कामगार मंडळ मार्फत वितरित केले जाणाऱ्या भांडे संचासाठी रात्रीपासून धडगाव शहरात कामगार मंडळाच्या कार्यालयाजवळ रांगेत उभे राहून भांडे संच मिळण्यासाठी वाट पाहिली. दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत महिलांना भांडे संच मिळाले नसल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. ऑनलाइन साईट बंद अथवा भांडे संच काढून घेतल्याचा आरोप महिलांनी केला आहे.