धुळे जिल्ह्याला हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रामी शिवारात दारूच्या नशेत एका सावत्र बापाने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला जमिनीवर आपटून ठार केले. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना मुलाच्या जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोर घडली. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी सावत्र बापासह जन्मदात्या आईलाही अटक केली आहे.