सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल मंडळ आणि जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्यावतीने नाशिकमध्ये वक्ते, ग्रंथ अन्वेषक व केंद्र कार्यवाह यांचे जिल्हास्तरीय संयुक्त कृतिसत्र घेण्यात आले. सुमारे २०० वक्ते अभ्यासक यांचेशी वर्षभर जनमानसात मांडायचे अभ्यासपूर्ण विषयांवर संवाद साधला. कृतीसत्रासाठी विद्यापीठाचे मंडळाचे प्रा. डॉ. हरिश्चंद्र नवले, अजय ठुबे, केदारे, प्रा. डॉ. संजय सानप, श्री. श्रीपाद बुरकुले आदींसह मान्यवर उपस्थित होते.