मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात नागपूर विभागातील ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांत एकदिवसीय 'इशारा आंदोलन' पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही अनुचित निर्णय झाल्यास, विराट मोर्चा आणि आमरण उपोषण करण्याची तयारीही ओबीसी संघटनांनी दर्शविली आहे.