पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, प्लॉट नं. २२, टाकळी सिम,येथे राहणारे फिर्यादी प्रविण यशवंतराव शेन्द्रे, वय ४७ वर्षे हे त्यांचे कामावर गेले तसेच, मुलगी कॉलेज मध्ये गेली व त्यांचे पत्नी राहते घराला कुलूप लावुन फुले आणण्याकरीता बाहेर गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कड़ी कोडा, कुलुप तोडुन आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख २५,०००/- रू., सोन्याचे वेगवेगळे दागिने असा एकूण तीन लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.