मेहकर लोणार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा व यासारख्या नुकसानग्रस्त भागाला विशेष पॅकेज देण्यात यावे.यावर्षीच्या पावसाळ्यात पावसाच्या सुरुवातीलाच शेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये परिपूर्ण सर्वे झाला नाही व जो सर्वे झाला याला अजून मदत मिळाली नाही.असे असताना सद्य परिस्थितीत पावसाचे प्रमाण वाढले व यामुळे संपूर्ण शेती धोक्यात आलेली आहे. याकरिता लोणार मेहकर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अशा प्रकारची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे.