गेल्या काही दिवसापासून नेर तालुक्यात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाई ईजारा येथील रुपेश देविदास राठोड यांच्या शेताला तर तलावाचे स्वरूप आले असून त्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून सोयाबीन पेरले होते परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने मदत करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना रुपेश राठोड यांनी दिले आहे.