6 सप्टेंबरला रात्री 7:30 च्या सुमारास कळमना परिसरातील रस्त्यावरच अचानक साप आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या सापाला सुरक्षित रेस्क्यू केले. सुदैवाने या घटनेत कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. रस्त्यावर साप आढळल्याने मात्र नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले.