सातारा शहरातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला आज पासून सुरुवात झाली आहे, राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते, शेटे चौक येथील प्रकाश मंडळाच्या गणपतीचे आरती करून, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, साताऱ्यातील प्रकाश मंडळ, श्री सिद्धिविनायक मंडळ, मंडईचा राजा या प्रमुख मंडळाच्या गणपतीची मिरवणूक आज, शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सुरुवात झाली, आजच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, सर्व मंडळांनी पारंपारिक वाद्याचा वापर केला