नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे गट क व गट ड अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा मेळावा उद्या दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्यात प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.