श्रीगोंद्यात काँग्रेसची रणधुमाळी सुरू – "टायगर जिंदा है" घोषणेतून मोर्चेबांधणीला वेग श्रीगोंदा– आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांच्या संयुक्त बैठकीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकजूट दिसून आली. बैठकीत प्रेरणा ओगले यांनी "टायगर जिंदा है" अशी हाक देत काँग्रेस कार्यकर्त्यांत जोश निर्माण केला. सर्व आगामी निवडणुका ताकदीनिशी लढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला