शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली परंतु त्यामध्ये मोठा घोळ दिसून येत आहे. सन 2024 चा पिक विमा आधीच उशिरा देण्यात येत आहे आणि त्यातही अनेक शेतकऱ्यांना 19 रु, 24 रु,74 रु,90 रु आणि 100 रुपये अशी अगदी अत्यल्प आणि तुटपुंजी रक्कम मिळाली आहे. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान असून भारतीय कृषी पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, शेतकऱ्यांचा अपमान कदापिही सहन केला जाणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतली.