गुन्हे शाखा कक्ष दोन वसई कार्यालयाचे पोलीस अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना वसई पेल्हार परिसरातील एका मैदानात अग्निशस्त्र बाळगलेला इसम असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आरोपी शुभमकुमार तिवारी याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.