मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरांच्या सुरक्षिततेबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, झोपडपट्टीत राहणारे मुंबईकर त्यांच्या घरांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. सरकार म्हणून आम्ही २०११ पर्यंत अधिकृतरित्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.