चाळीसगाव: माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव शहरात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ चौधरी वाड्यातील महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन पोलिस स्टेशनवर निषेध मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान, नागरिकांनी पोलिसांना एक निवेदन सादर केले. निवेदनामध्ये, आरोपींना तात्काळ अटक करण्याची आणि या प्रकरणाचा खटला जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे.