पाथ्रड गोळे येथे स्मशानभूमीत ग्रामसभा पार पडली.या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना विकास कामे आदींवर चर्चा करण्यात आली प्रलंबित विषय तत्काळ मार्गे लावण्याची ग्वाही सरपंच नीलिमा चोपडे यांनी उपस्थितांना दिली. ग्रामपंचायत,शाळेमध्ये,सभागृहात,गावात किंवा इतरत्र ठिकाणी ग्रामसभा पार पडल्याचे अनेकांनी ऐकले आहे. परंतु चक्क स्मशानभूमीमध्ये ग्रामसभा पार पडल्याने नेर तालुक्यामध्ये हा चर्चेचा विषय बनला आहे.