गावातील व्यक्तीसोबत असलेले अनैतिक संबंध मुलाला दिसल्यावरून अनैतिक संबंध उघड होतील या भीतीपोटी मुलाची आई व तिच्या प्रियकराने मिळून मुलाला ठार केल्याची घटना 2020 मध्ये घडली होती. या प्रकरणी नेर पोलिसांनी गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी याची साक्ष ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी शोभा नामक महिला व तिचा प्रियकर नरेंद्र या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.