सुरजागड–गट्टा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने सुरू केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे निजी सचिव सुनील मित्रा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.श्री. मित्रा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांना या रस्त्याच्या खराब स्थितीची माहिती असून, ते १२ सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये या विषयावर निर्णय घेणार आहेत.