जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला सिमेंटची वीट, लाथाबुक्क्यांनी आणि चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना आकुर्डी येथे घडली. या प्रकरणी शंकर हनुमंत हेळावारु (रा.शितळादेवी मंदिराजवळ, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.