मिरा रोड येथील रहिवासी असलेल्या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झाले. आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकळी 4 च्या सुमारास त्यांनी 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत होती. आज अखेर मिरा रोड येथे त्यांचं निधन झालं आहे.