20 ऑगस्टला सायंकाळी अनिल जानूकी टेकाम हे एम एच 29 बीटी 6797 या क्रमांकाच्या दुचाकीने कामावरून घरी येत असताना कोणीतरी अज्ञात वाहन चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल टेकाम यांच्या वाहनास ठोस मारून अपघात केल्याने अनिल टेकाम अतिशय गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना दोन सप्टेंबरला उघडकीस आली.