बांदा येथील पडवे-माजगाव (धनगरवाडी) येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. लक्ष्मीकांत शिंत्री (३३, मूळ रा. निगडी पुणे) असे मृताचे नाव असून ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी कृत्तिका शिंत्री यांनी पोलिसात घटनेची फिर्याद दिली.