भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आपल्या दमदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले व्ही.एस. लक्ष्मण यांनी आज ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साईचरणी आपली श्रद्धा व्यक्त केली. लक्ष्मण सकाळी शिर्डीला दाखल झाले. मंदिरात प्रवेश करताच संस्थानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी समाधीमंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून समाधीचे दर्शन घेतले.