गेले 3 दिवस पेण ते भाल एस. टी.बस ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल रायगड विभागाने खडित ठेवला होता, ह्या छोट्या कारणाने कित्येक प्रवासी वर्गाचे नुकसान झाले, ही बाब युवासेनाला समजता आज शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास युवासेना रायगड उपजिल्हा अधिकारी निलेश म्हात्रे आणि युवासेना पेण तालुका अधिकारी योगेश पाटील यानी सदर पेण बस स्टैंड येथे बस वाहतूक कक्षच्या अधिकारी याना धारेवर धरुन प्रवासाचे होणारे हाल त्यांच्या नजरेस आणले व असा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही.