तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत विजेचा धक्का लागून नाका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. केजीएन फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीच्या प्रवेशद्वार परिसरात नाका कामगार काम करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का लागला आणि तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. राज पंडित असे मृत कामगाराचे नाव असून याप्रकरणी बोईसर पोलीस अधीक तपास करीत आहेत.