Download Now Banner

This browser does not support the video element.

सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या बीएमटीसी कर्मचाऱ्यांना 10 लाख मोबदला देण्याच्या आ.पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Kurla, Mumbai suburban | Sep 12, 2025
सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या बीएमटीसी कर्मचाऱ्यांचा 1984 पासून बससेवा बंद झाल्याने निराधार झालेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, पीएफ व ग्रॅज्युईटी मिळालेल्या 631 कर्मचाऱ्यांना लवकरच सिडकोच्या माध्यमातून प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या चेकचे वाटप केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी कर्मचारी व संघटनांनी मोठा पाठपुरावा केला होता. अशी प्रतिक्रिया आज शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us