सुखापुरी येथे हैदराबाद गॅझेट लागू झाल्याबद्दल जल्लोष सुखापुरी हैदराबाद गॅझेट लागू झाल्याच्या निमित्ताने सुखापुरी गावात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघाले असून, गल्लीबोळात, चौका-चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून ग्रामस्थांनी आपला आनंद व्यक्त केला. हैदराबाद गॅझेटमुळे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळाल्याने एक वेगळाच आनंद साजरा करण्यात आला.इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना असल्यामुळे ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. गावात