बाज़ारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह्ज कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्या आणखी एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. निकेश इरपाची (वय ३२) असे या मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे स्फोटातील मृतांची संख्या आता दोन झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री कंपनीत झालेल्या या स्फोटात एक सुपरवायझर जागीच ठार झाला होता, तर एकूण २० कामगार जखमी झाले होते.