उदगीर शहरातील बस्थानकात एकाचे बळजबरीने सहाशे रुपये काढून घेतल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता घडली याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात चौघा अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, फिर्यादी मुरलीधर अशोक बनसोडे राहणार बोळेगाव हे गावाकडील एसटी बस गेल्याने बस्थानक येथील पत्र्याच्या शेडमध्ये बसला असता अज्ञात चौघा आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील सहाशे रुपये बळजबरीने काढून घेतले, याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय