बुलढाणा शहरातील महावीर नगर येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पर्वाधीराज पर्युषण पर्व समाप्ती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणीचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सस्नेह भेट देत मंदिरात मनोभावे दर्शन घेतले.