संग्रामपूर वरवट बकाल रस्त्यादरम्यान पांडव नदी जवळ विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर ओव्हरटेक करण्याचे नादात केळी वाहतूक करणाऱ्या आयशरला दिलेल्या जबर धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री घडली.दीपक प्रताप सिंग पवार असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी आयशर चालक प्रवीण श्रीकृष्ण म्हसाळ यांनी दिलेल्या फिर्यादवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.