मा. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून 'अंगदान-जीवन संजीवनी अभियान' अंतर्गत दि. 3 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर "अवयवदान पंधरवडा" साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे 11 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद नूतन सभागृहात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अवयव दान प्रतिज्ञा घेतली