गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या दोन्ही रुग्णांची विचारपूस केली. या भेटीदरम्यान सहपालकमंत्री जयस्वाल यांनी क्षितिज तुळशीदास मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे या दोन्ही अपघातग्रस्त युवकांशी थेट संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला.