दिनांक दोन तारखेला सकाळी आठ ते दुपारी तीन-चार दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घर फोडी करून 25 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ठाणेगाव येथे घडली या संदर्भात शुभांगी सुनीलराव बनसोड राहणार ठाणेगाव यांनी कारंजा पोलिसात तक्रार दाखल केली आहे या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली