कारंजा तालुक्यातील खैरी धरणाच्या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे या बिबट्याने अनेक पशुपालकांच्या जनावरांचा फडशा पाडला असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याला जंगल परिसरातून कैद करून इतर ठिकाणी हलवावे अशी मागणी शेतकरी शेतमजूर पशुपालक यांनी केली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतात जायला मजूर तयार नाही.. हा बिबट्या वन विभागाच्या कॅमेरात कैद झाला..