धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील दुर्गा हौसिंग सोसायटीमध्ये एका सेवानिवृत्त परिचारिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. या घटनेत चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि चार हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.