बार्शी तालुक्यातील भोयरे शिवारात जप्त करण्यात आलेला गांजा 100 किलो नसून 692 किलो असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात 23 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन दिली. गांजा कोठून आणला जात होता, कुठे नेला जात होता, त्यामध्ये कितीजण सहभागी आहेत, स्थानिकांचा सहभाग आहे का, कधीपासून हा प्रकार सुरु होता याचा सखोल तपास सुरु आहे. या कारवाईत 1 कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.