मुंबई- आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. विवळवेढे नजीक ट्रेलर चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर एका कारला आणि पिकअप टेम्पोला धडकल्याने हा अपघात घडला. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारसह इतर भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.