महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मागे घ्यावे, रद्द करावे या मागणीसाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती,शिरपूर तर्फे अँड हिरालाल परदेशी यांच्या नेतृत्वाखाली 10 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.