राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दिनांक ३१, ऑगस्ट रोजी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. लोणी बुद्रुक म्हस्के वस्ती येथील माजी मंत्री, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वस्ती शेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजाऱ्यामध्ये ९ ते १० वर्ष वयाच्या मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले. याबाबत आज १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा.वनविभागाने माहिती दिली.