हिंगणघाट शहरात महिलेची हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळ जनक घटना पोळ्याच्या दिवसी समोर आली आहे.मृत्यक महिला माधुरी व आरोप सुभाष वैद्य हे गेल्या ७ वर्षापासून एकत्र राहत असल्याचे सांगण्यात येते आहे. चार दिवसापूर्वी सुभाष याने माधुरीची धारदार शस्त्राने हत्या केली, जमिनीत पुरल्यावर स्वतःच पोलिसात हरवली असल्याची तक्रार देखील दाखल केली. पोलिसांनी कसून तपास केल्यावर मात्र मोठे रहस्य समोर आले आहे. हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर येताच शहरात खळबळ उडाली आहे.