धुळे शहरात महावितरणच्या अत्याधुनिक टीओडी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहायक अभियंता मनोज गायधनी यांच्या फिर्यादीवरून मच्छी बाजारातील मोहंमद सलीम मुस्तफा याच्यावर १५,७२९ रुपयांची ६२६ युनिट वीजचोरी नोंदवली. तर सहायक अभियंता पॉवर हाऊस यांच्या तक्रारीवरून दीपक नवघरेवर ५,५७५ रुपयांची २३९ युनिट वीजचोरीची कारवाई झाली. दोन्ही प्रकरणे पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत दाखल झाली.