अजनुज येथे आमदार विक्रम पाचपुते यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी घेतला उपोषण सोडण्याचा निर्णय श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे स्मशानभूमी जागा व जलजीवन मिशन योजनेशी संबंधित विविध प्रश्नांवरून गेल्या काही दिवसांपासून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते. आज सायंकाळी सहा वाजता आमदार विक्रम पाचपुते यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी आपुलकीने चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित समस्या मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले