रत्नागिरी तालुक्यातील गावडे- आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार २६ ऑगस्ट रोजी ७ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास घडली. जिलानी राजेंद्र डोर्लेकर वय ४३ राहणार गावडे- आंबेरे रत्नागिरी असे खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.