घेतलेले दहा लाख रूपये परत देत नाही, उलट दमदाटी करतो म्हणून सख्ख्या मेव्हण्यानेच साल्याचा चाकूने सपासप वार करत गळा कापून निघृण खून केल्याची अतिशय थरारक घटना तालुक्यातील मेरा खुर्द येथील मेरा चौकी फाट्यावर (दि.२३) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. यावेळी आरोपी व मृतक यांच्यात झालेल्या जोरदार झटापटीत फाट्यावरील फळविक्रेत्याचेदेखील मोठे नुकसान झाले. खून केल्यानंतर एक आरोपी पळून गेला तर आरोपी मेव्हणा हा स्वतःहून अंढेरा पोलिसांच्या स्वाधीन झाला.