सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतली 'आपल्या माणसांसोबत' चहाची बैठक; म्हणाले, 'मी आजही मतदारसंघातली नाळ तुटू देणार नाही' राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील वायगाव पाटी येथील एका साध्या चहाच्या टपरीवर बसून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. मंत्रिपद मिळाल्यानंतरही आपल्या जुन्या सवयी आणि लोकांशी असलेले नाते कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले.