दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे रविवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात प्राचेता कल्लप्पा कमळे (वय 6) या बालिकेचा मृत्यू झाला. फिर्यादी निलप्पा अर्जुन कमळे यांनी मंद्रूप पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, प्राचेता हि तिच्या बहिणीसोबत अमोगसिद्ध मंदिराकडे पायी चालत असताना, भंडारकवठ्याकडून तेलगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्रा पिकअप त्याचा क्र. MH-13 DQ-9973 या वाहनाने जोराची धडक दिली.