उदगीर अहमदपूर मार्गालर उदगीर लगत शिवनखेडकडे जाणाऱ्या ऑटोची व समोरून येणाऱ्या क्रिएटा कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटोचालक गंभीर जखमी झाला असून ऑटोचे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोमवारी २५ ऑगस्ट रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कार चालकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उदगीर ते अहमदपुर जाणाऱ्या रोडवर कार चालकाने ऑटोला समोरून जोराची धडक मारली यात ऑटो चालक गंभीर जखमी झाला आहे.